माणूस नेहमी सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी, कामासाठी धडपड करत असतो. आणि ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. फक्त काम करतच राहणे आणि ती गोष्ट मिळवणे हा माणसाचा स्वभाव बनला आहे.  पण मला असं वाटतं, प्रत्येक गोष्टीमध्ये "मी" किती समाधानी आहे,मी किती आवडीने ते काम करण्यास सक्षम आहे हे अभ्यास करणे महत्वाचे आहे.आपल्याला कोणतेही काम करत असताना त्यात आपली रुची आणि आवड हवी.                                 उदाहरणार्थ :- "सावित्रीबाई फुले" यांना शिक्षण संस्था उभी करायची होती, पण त्यांचा खूप विरोध झाला आणि त्यांच्यावर शेण आणि दगडांनी फेकून त्यांना मारले. पण,त्या कठीण परिस्थितीतही त्या कधीच डगमगल्या नाहीत. आणि शिक्षण संस्था पुढे उभी करून कित्येक मुलींना, बायकांना त्यांनी शिक्षण दिले. आजच्या आधुनिक युगामध्ये कॉम्प्युटरचा ज्यांनी शोध लावला, "बिल गेट्स" अगदी अडाण्यांनासुद्दा कॉम्पुटर सहज रित्या हाताळता येऊ शकेल आसा शोध त्यांनी लावला.   डान्स क्षेत्रातले "मायकेल जॅक्सन" ह्यांनी तर डान्स चा इतिहासचं रचला. आपल्या कुशल अभिनयातून लोकांना खळखळून हसवलं असे आपले "चार्ली चापलिंग", हे आणि असे भरपूर उत्कृष्ट उदाहरण आपल्याला मिळतात. ह्या सर्व यशस्वी महानुभावांनी आपली भूमिका आणि passion ला त्यांनी मोठे केलं. हे खूप शिकण्यासारख आहे. मला असे वाटते की, कोणतीही फिल्ड असो त्यामध्ये आपण, लोक कल्याण आणि आपला थोडा स्वार्थ असलं की आपणही मोठे होऊ शकतो हे महत्वाचे आहे ...                 
अर्जुन रंगरेज.

Comments

Popular posts from this blog